दगडात देव आहे का ?
किंवा दगडात देव असू शकतो का ?
माझा दृष्टीकोन..
दगडात कसा काय देव असू शकतो ?
हा प्रश्न हल्ली अनेकजण विचारताना दिसतात..
हाच प्रश्न मी आज स्वतःला विचारला,
आणि मला जे उत्तर सापडलं ते मी तुमच्याशी 'शेअर ' करू इच्छितो..
हा प्रश्न हल्ली अनेकजण विचारताना दिसतात..
हाच प्रश्न मी आज स्वतःला विचारला,
आणि मला जे उत्तर सापडलं ते मी तुमच्याशी 'शेअर ' करू इच्छितो..
मुळात,' दगड ' ह्यात काय 'गुण 'आहेत ज्यामुळे दगडात देव आहे ह्याचा विचार करू..
सर्वप्रथम म्हणजे,
दगड हा सगुण असला, तरी निर्विकार आहे..
दगडाला कुठचीही 'भावना ' नाही..
स्वभाव अतिशय कणखर..
दगडाला त्याच्या स्वभावाचा ' गर्व 'नाही..'
'अहंकार 'तर त्याहून नाही...
दगडाला कुठचाही ' लोभ 'नाही.
.' काम,क्रोध,मत्सर' ही नाही.
.'Superior किंवा Inferior हा Complex नाही..
सर्वप्रथम म्हणजे,
दगड हा सगुण असला, तरी निर्विकार आहे..
दगडाला कुठचीही 'भावना ' नाही..
स्वभाव अतिशय कणखर..
दगडाला त्याच्या स्वभावाचा ' गर्व 'नाही..'
'अहंकार 'तर त्याहून नाही...
दगडाला कुठचाही ' लोभ 'नाही.
.' काम,क्रोध,मत्सर' ही नाही.
.'Superior किंवा Inferior हा Complex नाही..
आपल्यापेक्षा एखादा दगड मोठा आहे, ह्याचं दुःख नाही, कि ' आपण कुणाच्यातरी पेक्षा मोठे आहोत ' ह्याचा आनंद नाही..
कसलाही अभिमान नाही..
आपल्यावर पाय ठेवून कुणीतरी वर चढतोय ही इर्षा नाही, आसुया नाही...
मंदिरातल्या दगडाची, रस्त्यावरच्या दगडाला ' हेटाळणी' नाही..
' उच्च,' ' नीच ' हा भेद नाही..
कसलाही अभिमान नाही..
आपल्यावर पाय ठेवून कुणीतरी वर चढतोय ही इर्षा नाही, आसुया नाही...
मंदिरातल्या दगडाची, रस्त्यावरच्या दगडाला ' हेटाळणी' नाही..
' उच्च,' ' नीच ' हा भेद नाही..
लहान दगड, वृद्ध दगडाला वृद्धाश्रमात टाकून जात नाही,
किंवा मोठा दगड, चिमुकल्या दगडाला पायरीवर सोडूनही जात नाही...
दगड कधीच दुधाचा 'अभिषेक 'मागत नाही.
.'शेंदुराचा लेप ' मागत नाही..
कधीच 'चद्दर ' किंवा
Candle सुद्धा मागत नाही..
दगडाला सोन्याचे मुकुट नकोत,
कि चांदीचे चौरंग नकोत..
.'शेंदुराचा लेप ' मागत नाही..
कधीच 'चद्दर ' किंवा
Candle सुद्धा मागत नाही..
दगडाला सोन्याचे मुकुट नकोत,
कि चांदीचे चौरंग नकोत..
अरे कोण म्हणतं कि दगडात देव नाही ?
मी म्हणतो,
"कि दगडात हे सगळे दुर्गुण नाहीत..
म्हणूनच दगडात देव ' आहे ' ..नव्हे..
आता फक्त दगडातच देव आहे..
फक्त दगडातच देव आहे. व पु काळे.. लेखक
माझे मत देव धर्म हा ज्यांच्या त्यांच्या विचार विवेक यावर अवलंबून आहे.... कोणी दगडाची पूजा करतो म्हणून त्याला अज्ञानी ठरवण्याचा अधिकार कोणालाहि नाही...हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा प्रश्न आहे... सगळे धर्म चांगली शिकवण देतात उगाच वाद निर्माण करून राजकीय स्वार्थ साधणारे हे वाद निर्माण करीत असतात ..
सतीश धडे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा